पनवेल परिसरात सापडले अल्पवयीन मुलीचे अर्भक...
पनवेल परिसरात सापडले अल्पवयीन मुलीचे अर्भक...
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः एका अल्पवयीन मुलीचे अर्भक पनवेल परिसरात सापडल्याने एकच खळबळ उडाली असून सदर मुलीच्या आई वडिलांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
नांदगाव परिसरातील एका झाडीमध्ये एका नवजात बालकीचे अर्भक सापडले आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस परिसरात कसून चौकशी करीत आहेत. या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी सदर अज्ञात आई वडिलांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तसेच या संदर्भात कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
फोटो ः नवजात अर्भक
Comments