महाराष्ट्र राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सुदाम पाटील यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विविध नागरि समस्यांबाबत साकडे...
महाराष्ट्र राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सुदाम पाटील यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विविध नागरि समस्यांबाबत साकडे
पनवेल, दि.16 (संजय कदम) ः पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध नागरि समस्येसंदर्भात महाराष्ट्र राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सुदाम पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून विविध समस्यां संदर्भात त्यांच्या समोर निराकरण करण्यासाठी साकडे घातले आहे.
या अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान पनवेल शहराच्या पाणी पुरवठा (न्हावा-शेवा) योजने संदर्भात, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणेबाबत, पनवेल महानगरपालिकेचा आकृतबंध मंजूर झाला असून भरती प्रक्रिया राबविणेबाबत, पनवेल महानगरपालिकेचा साडेदहा हजार कोटीचा विकास आराखड्या संदर्भात, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर स्थानिक संस्थांना भरपाई देण्याबाबत अधिनियम 2017 अंतर्गत राज्यातील महापालिकांना अनुदान वितरित करण्यात येते त्याची थकबाकी येणेबाबत, सिडको विकसित नोड पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत करणेबाबत, तळोजा औद्योगिक वसाहतीमधून होणारे जलप्रदुषण व वायु प्रदुषण संदर्भात कारखान्यांवर कडक कारवाई करणेबाबत, तसेच सिडकोच्या नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, कळंबोली, रोडपाली नोड त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग क्र.548 कळंबोली सर्कल ते टी पॉईंट हील पर्यंत व राष्ट्रीय महामार्ग क्र.48 कळंबोली तळोजा रोड तसेच कळंबोली सर्कल जवळील मॅकडोनल्ड समोर असंख्य खाजगी बसेस व अवजड वाहने बेकायदेशीररित्या पार्कींग केली जात असल्याने वाहतूक कोंडीसह अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करून सुद्धा वाहतूक त्यावर कारवाई करत नाही आहे, त्याचप्रमाणे नागरी वस्तीमध्ये ज्वलनशील केमिकलचे टँकर उभे करण्यात येतात त्यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. तसेच यातूनच भांडणे होतात व महिलांना येथून वावरणे असुरक्षित वाटते. तरी संबंधित वाहनांवर कायमस्वरुपी बंदी घालावी अशी मागणी सुद्धा सुदाम पाटील यांनी यावेळी केली आहे.
फोटो ः सुदाम पाटील
Comments