नवीन दागिने बनवून न देता फसवणूक करणाऱ्या आरोपीला राजस्थान येथून अटक...

नवीन दागिने बनवून न देता फसवणूक करणाऱ्या आरोपीला राजस्थान येथून अटक...

नवीन पनवेल : सोन्याचे नवीन दागिने बनवून न देता त्यांचा अपहार करून फसवणूक केल्याचा प्रकार पनवेल येथे घडला होता. यातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे.

            २०१८ मध्ये शिरढोण येथील मनोज हरिभाऊ महाडिक यांनी कर्नाळा बँकेसमोर उरण नाका येथील महालक्ष्मी ज्वेलर्सकडे ३ लाख १५ हजार रुपयांचे सोने दिले व त्या बदल्यात नवीन सोने बनवण्यासाठी सांगितले. मात्र त्याने महाडिक यांच्याकडून सोने घेऊन नवीन दागिने बनवले नाहीत. व सोन्याचा अपहार करून त्यांची फसवणूक केली. त्यानंतर रोशन गोपीलाल प्रजापती (३६) हा ज्वेलर्स दुकान बंद करून पळून गेला. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मनोज महाडिकसहाय्यक फौजदार संजय धारेरावपोलीस हवालदार यशवंत भोसलेपोलीस नाईक परेश म्हात्रे याना तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी राजस्थान येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यानी राजस्थान येथे जाऊन तपास केला आणि आरोपी रोशन गोपीलाल प्रजापती याला ताब्यात घेतले. त्याने आत्तापर्यंत १८ लाख ४६ हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. 

Comments