रस्त्यावर अश्लिल हावभाव करणाऱ्या चार जणींविरूद्ध पनवेल शहर पोलिसांची कारवाई...
पनवेल, दि.13 (संजय कदम): सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचारी लोकांना विभत्स चाळे, अश्लिल हावभाव व हातवारे करून असभ्य लज्जास्पद वर्तन करणाऱ्या चार जणींविरूद्ध पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पनवेल एसटी स्टॅंड परिसर त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात काही महिला सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर उभे राहून ये-जा करणाऱ्या पादचारी लोकांना विभत्स चाळे, अश्लिल हावभाव व हातवारे करून असभ्य लज्जास्पद वर्तन करतात याबाबतच्या तक्रारी विविध महिला संस्थांनी व संघटनांनी पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वपोनि विजय कादबाने यांच्याकडे केल्या होत्या. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांचे पथक व अ.मा.वा.प्र.कक्ष, गुन्हे शाखा आदींनी एकत्र येऊन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत चार महिलांना ताब्यात घेतले आहे व भा.दं.वि. कलम 294, 34 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.