हर्षला योगेश तांबोळी यांना २ पुरस्कार, दिल्ली येथे पार पडला सोहळा..
हर्षला योगेश तांबोळी यांना २ पुरस्कार, दिल्ली येथे पार पडला सोहळा..
पनवेल दि.२२ (वार्ताहर) : डायडम मिसेस इंडिया लेगसी 2021 या स्पर्धेत नवी मुंबई- पनवेल येथील हर्षला योगेश तांबोळी यांना पीपल चॉईस हा किताब आणि ब्युटी विथ पर्पज हा ताज असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

     डायडम मिसेस इंडिया लेगसी ही सौंदर्य स्पर्धा दिल्ली येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण देशभरातून अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी महाराष्ट्रातून चार महिलांची या स्पर्धेसाठी निवड झाली होती. नवी मुंबई-पनवेल मधून हर्षला योगेश तांबोळी यांची या अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना होणारे मासिक त्रास आणि अडचणी याबद्दल जनजागृती करणे असा होता. हर्षला तांबोळी यांनी यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. तसेच महिलांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. स्वर्गीय नारायण लक्ष्मण तांबोळी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हर्षला तांबोळी आणि योगेश तांबोळी अनेक उपक्रम राबवत असतात.

      या सौंदर्य स्पर्धेसाठी हर्षला तांबोळी यांना अनेकांचा पाठिंबा मिळाला. डायडम मिसेस इंडिया लेगसी या स्पर्धेत हर्षला तांबोळी याना पीपल चॉइस हा किताब आणि ब्युटी विथ पर्पज असे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image