युवा नेतृत्व सुदाम पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह..
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः पनवेल तालुक्याचे युवा नेतृत्व सुदाम पाटील यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकार्यांनी त्यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती जाहीर केली व सदर नियुक्तीपत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याांना प्रदान करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
राजकीय जीवनात त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षात असताना त्यांनी प्रत्येक आंदोलनात, कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला. परंतु स्थानिकांना न्याय देण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केला. त्यांच्या कार्यप्रणालीची दखल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली व त्यांच्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा.सुनील तटकरे यांनी विशेष प्रयत्न केले व त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली व सदर नियुक्तीचे पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नवीमुंबईचे निरीक्षक प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा शशिकला सिंह, ताहिर पटेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांना पद जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
फोटो ः सुदाम पाटील यांना नियुक्तीपत्र देताना उपमुख्यमंत्री अजित पवार व उपस्थित पदाधिकारी.