जबरीने चेन खेचून पळणाऱ्या आरोपीस रंगेहात पकडले..
जबरीने चेन खेचून पळणाऱ्या आरोपीस रंगेहात पकडले..
पनवेल / दि.२५ (संजय कदम)- नवीन पनवेल येथून एक ७० वर्षीय महिला पायी चालत जात असताना एका इसम सदर महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरीने खेचून पळून जात असताना स्थानिक नागरिकांच्या मदतीने खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने सदर इसमास मुद्देमालासह पकडण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 
          आरोपीचे नाव मंगेशकुमार शौकीन धिंग्या उर्फ मंगू, राह. वाल्मिकीनगर, पनवेल यास अटक करण्यात आली आहे व त्याच्याकडून 75,000/- ₹ एक सोन्याची चेन सुमारे दीड तोळे वजनाची हस्तगत करण्यात आली आहे. या आरोपीस पकडणे कामी मदत करणारे जागरूक नागरिक आनंद समलदार सिंग व सुखदेव रामभाऊ पाटोळे यांना खांदेश्वर पोलीस ठाणे तर्फे प्रशंसापत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास व.पो.नि. सुभाष कोकाटे व गुन्हे पो.नि. वैशाली गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरी. प्रविण पांडे हे करीत आहेत.
          

फोटो- जागरूक नागरिकांचा खांदेश्वर पोलिसांनी केला सत्कार
Comments