राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये पॉवरलिफ्टींग स्पर्धा संपन्न ...
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये पॉवरलिफ्टींग स्पर्धा संपन्न ...
पनवेल / प्रतिनिधी : -   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल येथे १२ ते २० डिसेंबर २०२१ या दरम्यान  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . त्यातील सुरुवातीस दिनांक १२ डिसेंबर २०२१रोजी हार्डकोर जिम कामोठे, पनवेल येथे पावर लिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.
 तरुणांनी पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला स्पर्धा ६५ किलो खालील व ६५ किलो वरील अशा दोन वजनी गटात आयोजित केल्या गेल्या ६५ किलो खालील वजनी गटात आशिष राजपूत यांनी एकूण २९० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले, विकास प्रजापती यांनी एकूण २७५ किलो उचलून रजत पदक , प्रथमेश कदम यांनी एकूण २२५ किलो वजन उचलून कास्य पदक पटकावले. तसेच ६५ किलो वजन वरील वजनी गटात.शुभंम केसरी याने एकूण ३१० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले , यश गायकवाड यांनी ३६० किलो उचलून रजत पदक पटकावले.
अजिंक्य इंगोले यांनी एकूण ३०० किलो वजन उचलून कास्यपदक पटकावले. 
तसेच बेस्ट लिफ्टरचा किताब आशिष राजपूत यांनी पटकावला. व ओव्हराल चा मान आशिष राजपूत, शुभंम केशरी,यश गायकवाड यांनी पटकावला. चौथा क्रमांक, नलिन येवले,गगन गोद्रीया,पुष्पीत शिंदे,रोहित कदम,उमेश चाळके,निखिल बडगर,प्रफुल्ल भाटीया आदीनी यशस्वीरीत्या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.
 सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
तसेच गौरी वरणकर (महिला शरिरसौस्टव) यांचा  सत्कार जिल्हाध्यक्ष श्री. किशोर देवधेकर सराच्या  हस्ते करण्यात आला व हार्डकोर जीम सदस्य कुमार यश सुनील पाटील याने हैदराबाद येथे झालेल्या एशियन थाय- बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावला त्याचा सत्कार हार्डकोर जिमचे ओनर यांनी केला.  राजेश थेटे, किशोर नारकर व दिनेश शेळके आदींचे विशेष सहकार्य मिळाले.
        
सदर कार्यक्रमास पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे पनवेल जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील,जिल्हा सचिव सुहास बनसोडे ,जिल्हा सचिव गोविंद मोरे ,जिल्हा सरचिटणीस  प्रदिप पाटील, खारघर शहराध्यक्ष शैलेश हंकार, कामोठे शहराध्यक्ष यशवंत लोखंडे, प्रभाग १२ अध्यक्ष राहुल थोरात, प्रभाग१२ उपाध्यक्ष गेजगे, प्रभाग १५ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५ अध्यक्ष महेशकुमार राऊत आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Comments