वाळू माफियांवर पनवेल तहसीलदारांची कारवाई...
वाळू माफियांवर पनवेल तहसीलदारांची कारवाई...

पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः खारघर परिसरातील रोडपाली येथील खारघर रेल्वे स्टेशन शेजारील खाडीत अवैध पद्धतीने वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियावर कारवाई करून, खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात वाळू माफिया वर गुन्हा दाखल केला आहे. या वेळी या कारवाई महसूल खात्याच्या पथकांनी वाळू च्या 2 ते 4 कोड्या आणि सक्शन पंप उद्धवस्त केले आहे. त्या सोबत वाहतुकी साठी बनवण्यात आलेला रस्ता देखील जे सी बी च्या मदतीने खड्डा करून बंद केला आहे. या कारवाई मुळे पुन्हा वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
खारघर शहरातील रोडपाली येथील खारघर रेल्वे स्टेशन शेजारील खाडीत काही वाळू माफियांनी अवैध पद्धतीने वाळू उपसा सुरू केल्याची माहिती पनवेल चे तहसीलदार विजय तळेकर यांना लागली होती, या वाळू माफिया ची माहिती घेऊन, सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश प्रभारी मंडळ अधिकारी संतोष कचरे यांना दिली होती, त्या नुसार कचरे यांनी तलाठी डी.एल.पवार आणि सचिन पवार या पथकांनी तहसीलदार यांच्या आदेशानुसार घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता, काही अज्ञात इसमानी अवैध पद्धतीने वाळू उपसा करून त्याच्या कोडी केल्याचे त्यांना दिसून आले. त्या नुसार या जे सी बी च्या मदतीने वाळू चा केलेला साठा उध्वस्त केला तसेच कोडी केलेली वाळू देखील जे सी बी च्या मदतीने समुद्रात लोटून दिल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे. खारघर शहरातील ही आत्ता पर्यत ची चौथी कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. या कारवाई बद्दल खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात वाळू माफियावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्या नुसार खारघर पोलीस माफियाचा शोध घेत आहे.
Comments