पनवेल मोटर वाहन निरीक्षक प्रकाश कर्चे यांचे रिक्षा चालकांना मार्गदर्शन .....
पनवेल मोटर वाहन निरीक्षक प्रकाश कर्चे यांचे  रिक्षा चालकांना मार्गदर्शन .....
पनवेल/प्रतिनिधी :- समाजामध्ये रिक्षाचालक म्हटलं की उद्धट भांडखोर अशी प्रतिमा डोळ्यासमोर सामान्य जनतेच्या लगेच उभी राहाते, राज्य शासनाने बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी रिक्षा परवाना खुला केला, त्यामुळे रिक्षांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.  व्यवसाय करताना  रिक्षा चालकांमध्ये खूप अडचण निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमुळे अनेक वाद निर्माण झालेले पाहायला मिळतात. अश्या गोष्टी परिवहन विभागाच्या निदर्शनास आले असता. पनवेल परिवहन विभागातर्फे रिक्षाचालकांना आदर्श रिक्षाचालक कसा असावा याकरिता मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. रिक्षाचालकाने नम्रतेने वागावे, नियमाचे पालन करावे अशा अनेक महत्व पूर्व बाबीवर मोटर वाहन निरीक्षक प्रकाश कर्चे यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.या वेळी  वसीम सलीम शेख व रिक्षा चालक मोठया संख्येने हजर होते.
Comments