मा.उपमहापौर विक्रांत पाटील आयोजित आधार कार्डला मोबाईल लिंक करण्याच्या कॅम्पला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद..
मा.उपमहापौर विक्रांत पाटील आयोजित आधार कार्डला मोबाईल लिंक करण्याच्या कॅम्पला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद..
पनवेल / वार्ताहर : -    प्रभाग १८ मधील नागरिकांच्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच करीत असतात.याच अनुषंगाने दि-१५/१२/२०२१  रोजी मोफत आधार कार्ड ला मोबाईल लिंक करण्यासाठी एक दिवसीय विशेष कॅम्प चे आयोजन नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयात करण्यात आले होते.

प्रभाग १८ मधील नागरिकांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला आणि या संधीचा लाभ घेतला.नागरिकांनी दिलेला प्रतिसाद बघता काही दिवसांनी पुन्हा एकदा विशेष कॅम्प चे आयोजन करण्यात येणार आहे.याबद्दलची माहिती काही दिवसांनी नागरिकांना देण्यात येईल.प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम नगरसेवक विक्रांत पाटील राबवत असतात त्याबद्दल कॅम्पला आलेल्या नागरिकांनी आभार मानले.
Comments