बेकायदेशीररित्या मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आलेले त्रिकुट गजाआड...
बेकायदेशीररित्या मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आलेले त्रिकुट गजाआड...

पनवेल, दि.10 (संजय कदम) ः विना परवाना अवैधरित्या मांडूळ जातीचा साप जवळ बाळगून त्याची विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने पनवेल जवळील पळस्पे फाटा येथील राहूल पार्क हॉटेल समोरील रस्त्यावर सापळा रचून अटक केली आहे.
शासनाची मांडुळ जातीच्या सापाची विक्री करण्यास बंदी असतानाही विना परवाना सदर साप जवळ बाळगून त्याची विक्री करण्यासाठी काही इसम येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 3 चे वपोनि शत्रुघ्न माळी यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि इर्शान खरोटे, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लाला लोणकर, पोलीस नाईक संजय फुलकर व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून यामध्ये आरोपी अरबाज मतीन शेख (24), शाशाअली सादीक पठाण (22), सागर नरसिंग शिंदे (22) यांना ताब्यात घेवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या निळ्या व काळ्या रंगाच्या हॅण्ड बॅगमध्ये एक काळा रंगाचा मांडुळ जातीचा साप आढळून आला. तसेच 500 रुपये किंमतीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा सुद्धा आढळून आला आहे. त्यानुसार तिघांवर भादवी कलम 420, 511 सह वन्य जीव प्राणी अधिनियम 1972 चे कलम 51, 52 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
Comments