नगरसेवक नितीन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे बसविण्यात आले स्पीड ब्रेकर्स....
नगरसेवक नितीन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे बसविण्यात आले स्पीड ब्रेकर्स....
पनवेल, दि. ३ (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्या प्रयत्नामुळे वाल्मिकी नगर परिसरात सिमेंट काँक्रीटीच्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर्स उभारण्यात आल्याने या ठिकाणी होणारे अपघात टळणार आहेत.
वाल्मिकीनगर  येथे वहाने अतिशय वेगाने येतात. त्यामुळे लहानमुले ,ज्येष्ठ नागरिक यांना ये-जा करणे त्रासाचे होते म्हूणन तिथे स्पीडब्रेकर ची गरज आहे. अशी तक्रार स्थानिकांनी  भाजपा पनवेल शहर सरचिटणीस - नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्या कडे केली असता त्यांनी लगेच महापालिकेला लेखी पत्राद्वारे कळविले व सातत्याने पाठपुरावा करून सदर ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून स्पीडब्रेकर टाकून घेतले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नितीन जयराम पाटील यांचे आभार मानले आहेत.


फोटो ः नितीन पाटील यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेले स्पीड ब्रेकर्स
Comments