कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या न्यु मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची यशस्वी घोडदौड कायम....
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या न्यु मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची यशस्वी घोडदौड कायम....

उरण : कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था ढासळली असतांना,उदयोगधंदे  सांभाळणे कठीण जात आहे. अशा परस्थितीत सुद्धा कामगार नेते. मा श्री. महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटना, व्यवस्थापन व कामगार यांची योग्य सांगड घालत पगारवाढीचे करार करत आहे.कामगारांना स्वाभिमानाने जगता येईल असे प्रयत्न करत आहे. कोरोनाचा कोणताही परिणाम संघटनेच्या कामकाजावर झालेला नाही. मा.महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली दर वर्षी साधारणता संघटनेच्या माध्यमातून जवळ जवळ 18 ते 20 पगारवाढीचे करार होत असतात.त्याप्रमाणे जानेवारी 2021 पासुनचा हा 12 वा करार मे.हिंद टर्मिनल उरण येथील पिनाकल मरिन सर्व्हिस मधील कामगारांना तब्बल 7,500 रुपयांचा भरघोस पगारवाढीचा करण्यात आला.  यामध्ये कामगारांना पहिल्या वर्षी 6000 (सहा हजार रुपये ), दुसऱ्या व तिसऱ्या वर्ष्यासाठी प्रत्येकी 750( सातशे पन्नास रुपये पगार वाढ त्याचप्रमाणे प्रत्येक कामगारास दरवर्षी 14%बोनस,प्रत्येक कामगारांना 300,000 ( तीन लाख रुपयाची ) मेडिक्लेम पॉलिसी देण्याचे मान्य करण्यात आले आहे. थकबाकी पोटी प्रत्येक कामगारांस  एक ते सव्वा लाख रुपये मिळणार आहेत. यावेळी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष. महेंद्रशेठ घरत संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष.  किरिट पाटील संघटनेचे संघटक योगेश रसाळ, रायगड जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, महाराष्ट्र फिशर मॅन संघटनेचे उपाध्यक्ष मार्तंड नाखवा. कंपनी व्यवस्थापना तर्फे संतोष जैन (डायरेक्टर) कामगारांच्यावतीने, लंकेश ठाकूर, प्रांजल भोईर, रवींद्र ठाकूर जयेश कडू, देवेंद्र ठाकूर, हरेश ठाकूर, मनोज पाटील, सर्वेश पाटील, संदेश भोईर, विशाल ठाकूर, मनोज ठाकूर उपस्थित होते. यावेळी सर्व कामगारांनी कामगार नेते व रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष  महेंद्रशेठ घरत व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे  आभार मानले.
Comments