आजीवली गावातील तरुणाने आई-वडिलांना घडवली हेलिकॉप्टरची सफर..
आजीवली गावातील तरुणाने आई-वडिलांना घडवली हेलिकॉप्टरची सफर..

पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः पनवेलमधील एका तरुणाने आपल्या आई वडिलांना 26 व्या वाढदिवशी हेलिकॉप्टरमध्ये बसवून सफर करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
आजिवली गावातील उमेश मगर हा गवंडी कामगाराचा मुलगा असून आई वडिलांनी त्याला शिकवून मोठे केले. याची जाण ठेवून उमेश याने आपल्या आई वडिलांना 26 व्या वाढदिवशी हेलिकॉप्टरची सफर घडवून आणली आहे. यावेळी आई वडिलांसह उमेश मगरच्या चेहर्‍यावर स्मित हास्य ओसंडून वाहताना दिसत होते.
Comments