शिवसेनेतर्फे आयोजित आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद...
शिवसेनेतर्फे आयोजित आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद...
पनवेल, दि. ४ (वार्ताहर) ः शिवसेना शहर शाखा खारघर यांच्या वतीने आयोजित मोफत रक्त तपासणी व नेत्र तपासणी शिबिराला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोबत पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत आदींसह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खारघर येथील शहर प्रमुख प्रकाश गायकवाड, शाखा प्रमुख वैभव दळवी यांच्यावतीने आणि राजगोबिंद नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मोफत रक्त तपासणी व नेत्र तपासणी शिबिरास खारघरसह परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी आयोजक पदाधिकार्‍यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देवून असे नागरी हिताचे कार्यक्रम यापुढेही राबविण्याचे आवाहन जिल्ह्यातील शिवसैनिकांना केले.


फोटो ः मोफत आरोग्य तपासणी शिबीर
Comments