कळंबोली व खारघर येथे महापालिकेच्या अतिक्रमण पथकाची धडक कारवाई...
पनेवल,दि. ३० : महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशान्वये महापालिका कार्यक्षेत्रातील कळंबोली आणि खारघर येथील अनधिकृत बांधकामांवर नुकतीच धडक कारवाई करण्यात आली.
गेल्या काही काळापासून कळंबोली आणि खारघर येथे अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ होताना दिसत असल्याने आयुक्तांच्या ओदशानूसार ,उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठी कारवाई करून अनधिकृत बांधकामे निष्कांसित करण्यात आली. यामध्ये कळंबोलीतील सेक्टर 16 मधील बाजारपेठांच्या पुढील भागात अतिक्रमण केलेली दुकाने, फूटपाथवरील अवैधरित्या सुरू केलेली दुकाने, आईसक्रिमचे गाडे, जमीन दोस्त करण्यात आले. तसेच कळंबोलीतील मार्बल पाँईट येथील अनधिकृतरित्या सुरू असलेली मार्बलची दुकाने, झोपड्यांवरती कारवाई करण्यात आली. तसेच न्यू पनवेल येथील गणेश मार्केटसमोरील फूटपाथवरील अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या.
सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे यांच्या आदेशानूसार खारघर प्रभागातील सेक्टर 15 मधील अनधिकृत वसलेली अनुदिक झोपडपट्टी जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त् करण्यात आली. अतिक्रमण विभागाची वाहने साह्याने ही कारवाई करण्यात आली.
यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ.वैभव विधाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन, प्रभाग समिती’ब’चे प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे , मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, प्रभाग समिती ‘अ’ चे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, पालिका कर्मचारी, पोलिस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.