१९७० पासून प्रलंबित असलेला पडघे तसेच आजुबाजूच्या गावातील नागरिकांचा प्रश्न शिवसेनेमुळे मार्गी लागणार...
१९७० पासून प्रलंबित असलेला पडघे तसेच आजुबाजूच्या गावातील नागरिकांचा प्रश्न शिवसेनेमुळे मार्गी लागून स्थानिकांना मिळणार न्याय

पनवेल, दि.13 (वार्ताहर):  पनवेल तालुक्यातील पडघे तसेच आजूबाजूच्या गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनींचा सातबाऱ्यावर सिडकोच्या महसूल विभागाने १९७० मधे भुसंपादनाचे शिक्के मारले होते. ह्या जमिनींवर सदर शिक्क्यांमुळे कसल्याही प्रकारची विकासकामे शेतकऱ्यांना करता आली नाहीत. याबाबत त्यांनी शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली कैफीयत मांडली.
           त्यानुसार सदर विषय मा. म्हाडा अध्यक्ष, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार व दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पत्रव्यवहार केला होता.  त्याच विषयाच्या अनुषंगाने आज स्थानिकांसह रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर ह्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तांचा हा महत्वाचा प्रश्न सोडवण्याची विनंती केली. सदर विनंतीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सिडको व्यवस्थापकांशी तसेच पनवेल महानगरपालिका आयुक्तांशी फोनवर चर्चा करून स्थानिकांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना केल्या त्यामुळे प्रलंबित असलेले अनेक प्रश्न मार्गी लागणार असल्याने शिवसेनेचे आभार मानले आहेत.

            
फोटोः जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना निवेदन देताना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील व इतर
Comments