चहाच्या टपरीत विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई...
चहाच्या टपरीत विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई...

पनवेल, दि.12 (संजय कदम): चहाच्या टपरीत विनापरवाना देशी दारूचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या महिलेवरूद्ध पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करीत तिच्याकडून दारूचा साठा हस्तगत केला आहे.

            करंजाडे येथील से.-1 याठिकाणी एक महिला प्लॉट नं.-159 मधील बिल्डींगच्या खाली चहाच्या टपरीमध्ये देशी संत्रा दारूचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती वपोनि विजय कादबाने यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मोनाली चौधरी, सपोनि शरद ढोले, पोलिस हवालदार चेतन पाटील व प्रतिबंधक पथकाने छापा टाकून तेथून जवळपास 1440 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Comments