कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलच्या वतीने करण्यात आले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांना आज अभिवादन करण्यात आले.
आज संपूर्ण भारतामध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. त्याचप्रमाणे आज कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मा.सभापती रामशेठ भोईर, सचिव भरत पाटील, पर्यवेक्षक प्रकाश नाईक व कर्मचारी मच्छिंद्र पाटील, दर्शन पगडे, वसंत म्हात्रे, पुरुषोत्तम पाटील, अनिल कांबळे, रघुनाथ गायकवाड, अनामिता खटावकर, रेश्मा गायकवाड, दिपीका खुटले, राम भगत, मनोहर जितेकर आदी कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.