13 वर्षीय मुलाचे अपहरण...
13 वर्षीय मुलाचे अपहरण...

पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः एका 13 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना तालुक्यातील टेमघर येथील फ्युचर होम्स सोसायटीच्या परिसरात घडली आहे.
या ठिकाणी राहत असलेल्या श्रीमती.राधाबाई आव्हाड यांचा 13 वर्षीय अल्पवयीन नातू सोसायटीच्या आवारामध्ये खेळत असताना त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कायदेशीर रखवालीतून त्यांच्या संमतीशिवाय फुस लावून पळवून नेले आहे. त्याची उंची 3 फूट, केस काळे बारीक, डोळे काळे, नाक सरळ, चेहरा गोल, रंग गोरा असून अंगात काळ्या रंगाचे फुल बाह्याचे स्वेटर व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट तसेच पायात स्लीपर आहे. त्याला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. या मुलाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
Comments