चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड ; 1 लाख 31 हजारांचे दागिने जप्त..
चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड ; 1 लाख 31 हजारांचे दागिने जप्त..

पनवेल दि.15 (संजय कदम)- पनवेल परिसरात हातचलाखीने चोऱ्या करून पिशवी किंवा पर्समधील दागिने सराईतपणे लंपास करणाऱ्या एका चोरट्यास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून जवळपास 1 लाख 31 हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
          शहरातील झवेरी बाजार पनवेल ते कृष्णाळे तलाव परिसरात एक महिला खरेदी करीत असताना आरोपी बाळू गोवर्धन पवार (वय-25) याने व त्याच्या साथीदाराने गर्दीचा फायदा घेऊन सदर महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करताच वपोनि विजय कादबाने, पोनि (गुन्हे) संजय जोशी यांच्या मार्गरदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि गणेश दळवी, पोहवा नितीन वाघमारे, पोहवा अविनाश गंथडे, पोना अशोक राठोड, पोना महेश पाटील, पोना भगवान साळुंके, पोशि संतोष मिसाळ आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे या आरोपीचा माग काढून बीड जिल्ह्यातील गेवराई येथे दोन दिवस थांबून सापळा रचून सदर आरोपीस गजाआड केले आहे व त्याच्याकडून दोन गुन्हे मिळून जवळपास 1 लाख 31 हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या कामगिरीबद्दल परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी वपोनि विजय कादबाने सह त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अभिनंदन केले आहे.
Comments