गाडी का ठोकली या वादातून मारहाण.....
गाडी का ठोकली या वादातून मारहाण.....

पनवेल, दि. 21 (वार्ताहर)- गाडी का ठोकली या वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना पनवेल शहरातील ठाणा नाका मार्गावरील मोठया (बडी) दर्गाजवळ घडली आहे.
             मौसिन मिस्त्री (मय-34) व वैजनाथ आंधळे हे एकमेकांच्या ओळखीचे नसून मिस्त्री यांनी त्यांचा ट्रक त्याठिकाणी उभा करून ठेवला होता. यावेळी वैजनाथ आंधळे हे त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट गाडी मागे घेत असताना ट्रकला गाडीचा धक्का लागला. याबाबत बोलाचाली होऊन त्यानंतर मौसिन मिस्त्री यांना शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केल्याने गाडी का ठोकली अशी विचारणा केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात केली आहे.
Comments