बिगारी काम करणारा कामगार जखमी...
बिगारी काम करणारा कामगार जखमी...

पनवेल, दि. २९ (वार्ताहर) ः बिगारी काम करणार्‍या कामगाराला एका दुचाकीची धडक बसल्याने तो जखमी झाल्याची घटना कळंबोली सर्कल परिसरात घडली आहे.
मुंब्रा-पनवेल रोडवरील कळंबोली सर्कल वरील सर्कलवर उभ्या असलेल्या दुचाकीला मागून आलेल्या बल्कर गाडीने धडक दिल्याने दुचाकीवरील बिगारी काम करणारा कामगार बबन जाधव हा जखमी झाला आहे. त्याला तातडीने नजिकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून या अपघाताची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments