तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये पार्किंग व्यवस्था सुस्थितीत न आणल्यास शिवसेना आंदोलन छेडणार : बबनदादा पाटील
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये पार्किंग व्यवस्था सुस्थितीत न आणल्यास शिवसेना आंदोलन छेडणार : बबनदादा पाटील

पनवेल, दि.30 (वार्ताहर) : दोन दिवसापूर्वी तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये एका मोटार सायकलला अपघात होवून त्यात तीन जणांचा नाहक जीव गेला आहे. सदर अपघात टाळण्यासाठी तळोजा औद्योगिक वसाहतीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे करण्यात येणारे टँकर हटवावे अशा मागणीचे पत्र शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीच्या बाजूला नुकताच मोठा अपघात झाला. असे अपघात त्या भागात वारंवार घडत असतात. हे अपघात दिपक फर्टीलायझर कंपनीच्या जवळ असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला टँकर उभे करण्यात येत असल्यामुळे घडतात. तरी अशा अपघातांची पुनरावृत्ती होवू नये म्हणून रस्त्यावर उभे असणारे टँकर कंपनीने एका ठिकाणी पार्कींग करून लावावेत, तशा वाहतूक शाखेने आवश्यक त्या सुचना द्याव्यात. जेणेकरून हे अपघात टाळता येतील. अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरुन या विरोधात आंदोलन छेडेल असा इशारा जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी दिला.


Comments