मनसे आयोजित स्व.शीतल सिलकर स्मरणार्थ किल्ले स्पर्धेत कोळीवाडा समाज मंडळाला प्रथम मानांकन...
मनसे आयोजित स्व.शीतल सिलकर स्मरणार्थ किल्ले स्पर्धेत कोळीवाडा समाज मंडळाला प्रथम मानांकन...

पनवेल वैभव वृत्तसेवा : छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास आणि मराठ्यांच्या शौर्याचे जिवंत स्मारक असलेल्या गड किल्ल्यांचे महत्व आणि महती तरुण पिढीत रुजविण्यासाठी तसेच छोट्या बालकलाकारांसाठी कलेस वाव आणि प्रोत्साहन देण्याचे हेतूने शाखा अध्यक्ष अवधूत ठाकूर ,मनसैनिक विशाल चितृक व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहर यांनी यंदाच्या दिवाळीमध्ये किल्ले स्पर्धा आयोजित केलेली होती. सदर स्पर्धेचा बक्षीस समारंभ काश्यप हॉल पनवेल येथे पार पडला.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस  गजानन राणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते आस्थापना विभागाचे राज्य कार्याध्यक्ष योगेशजी चिले हे उपस्थित होते. या प्रसंगी गजानन राणे साहेबांनी आयोजक अवधूत ठाकूर ,विशाल चितृक यांचे कौतुक करून स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना दरवर्षी किल्ले कसे बनवता येतील त्यासंबंधी मार्गदर्शन केले.तसेच योगेश चिले यांनी मराठेशाही व हिंदुपतपातशाहीच्या किल्ल्यांबाबत इतिहास व काही किस्से सांगत सर्व उपस्थित स्पर्धक व शिव प्रेमींना भारावून सोडले. सदर स्पर्धेत पनवेल मधील जवळजवळ ५० मंडळांनी सहभाग घेतला होता. 
सदर कार्यक्रमास  पनवेल शहर अध्यक्ष संजय मुरकुटे व तालुका सचिव केदारजी सोमण यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्याने सदर स्पर्धा व बक्षीस समारंभ पार पडला. तसेच दिवंगत पनवेल शहर अध्यक्ष स्व. शीतल सिलकर यांचे स्मरणार्थ  कोळीवाडा समाज मंडळ यांना प्रथम पुरस्कार, कट्टा मित्र परिवार यांना दुसरे तर सदाशिव सोसा. मधील बालकलाकारांना तिसरा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. व सात स्पर्धकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमास पनवेल विधानसभा सचिव प्रतीक वैद्य, नवीन पनवेल शहर अध्यक्ष पराग बालड, पनवेल शहर उपाध्यक्ष रुपेश शेटे, शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, सचिन सिलकर, प्रथमेश सोमण, सिद्धेश खानविलकर, महिला शहराध्यक्ष प्रीती खानविलकर, शहर उपाध्यक्ष स्वरूपा सुर्वे ,तेजस्विनी ढवळे , ऍड. अक्षयजी जोशी, अनिमेश ओझे ,अभि रिंगे, हिमांशू पाटील,विशाल वंडकर, प्रवीण हरपुडे, मनोज घोगरे, अशोक शेंदरे,योगेश भोईर, गजेंद्र घाडी, रोशन ताटे, श्रेयस ठोकळ,  अतिष म्हामूणकर आकाश दलाल, व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments