शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरिष घरत यांच्या हस्ते गिरीजा वृद्धाश्रमाचे उदघाटन....
पनवेल / वार्ताहर : - आज रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी गिरिजा वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून खारघर सेक्टर १२ येथे उभारण्यात आलेल्या वृद्धाश्रमाचे उद्दघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांची भेट घेतली व आपुलकीने चौकशी व विचारपूस केली तसेच गिरिजा वेलफेअर असोसिएशनचे संचालक यांना पुढील त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी गिरिजा वेलफेअर असोसिएशन संचालक वसंत गुंजर, शिवसेना पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, शाखा प्रमुख रोशन पाटील अन्य पदाधिकारी व गिरिजा वेलफेअर असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.