इनोव्हा गाडी घेवून पसार झालेला आरोपी ताब्यात.....
इनोव्हा गाडी घेवून पसार झालेल्या आरोपीस घेतले ताब्यात.....

पनवेल, दि.19 (संजय कदम) ः ओळखीच्या व्यक्तीकडून जेवण आणण्याच्या बहाण्याने इनोव्हा गाडी घेवून पुणे-सोलापूर महामार्गावर पसार झालेल्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी गाडीसह ताब्यात घेतले आहे.
महादेव गडगे यांच्या शेजारी राहणार्‍या ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून आरोपी साहिल होगीत याने जेवण आणण्याच्या बहाण्याने त्यांची इनोव्हा गाडी घेवून त्यांची फसवणूक करून तो इनोव्हा गाडीसह पसार झाला होता. या संदर्भात गाडीचे फास्ट ट्रॅक लोकेशन व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता सदर गाडी ही पुणे-सोलापूर महामार्गावर असल्याचेे समजलेे. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी तेथील नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या गाडी व आरोपी संदर्भात माहिती दिली असता सदर गाडी थांबवून गाडीसह आरोपीला त्यांनी घेतले. वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लाला लोणकर व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी जावून सदर आरोपीला गाडीसह ताब्यात घेवून पनवेलला आणले आहे.
Comments