गावठी दारु हस्तगत...
गावठी दारु हस्तगत....

पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः तालुक्यातील डेरवली गावाच्या हद्दीत एका झोपडीच्या बाजूला बेकायदेशीररित्या ठेवण्यात आलेली गावठी दारु पनवेल तालुका पोलिसांनी हस्तगत केली आहे.
डेरवली गावाच्या बाजूला साई निकेतन सोसायटीच्या गेट समोरील झोपडीच्या बाजूला बेकायदेशीररित्या देशी दारु, संत्रा जीएम ज्याची किंमत जवळपास 960 रुपये इतकी आहे. ठेवण्यात आल्याची माहिती वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.धनश्री पवार, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, पो.ना.जमील शेख, शरद घुगे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून सदर माल हस्तगत केला आहे.
Comments