"आरटीपीएस"च्या विद्यार्थ्यांचे तलवारबाजी स्पर्धेत यश...
"आरटीपीएस"च्या विद्यार्थ्यांचे तलवारबाजी स्पर्धेत यश...
पनवेल ः प्रतिनिधी
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील (आरटीपीएस) विद्यार्थ्यांनी नाशिक येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत यश मिळविले आहे.
महाराष्ट्र राज्य आणि नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिक मिशन 2028 अंतर्गत राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या कालिका देवी मंदिर परिसरात करण्यात आले होते. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सोहम जंगम याने सुवर्ण, ओजस उदय पोवारने रौप्य, तर आदित्य संजय माने, निहाल हरीशकुमार सिंग, सिद्धार्थ उदय काकडे, आर्या बाळासाहेब रासकर व जन्नत संदीपकुमार त्रिपाठी यांनी कांस्यपदक जिंकले. याचबरोबर जालना जिल्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा विद्यार्थी वैभव शिवाजी बोटे याने उज्ज्वल यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments