पनवेल एस.टी स्टँड परिसरात एका इसमाची करण्यात आली ९० हजारांची फसवणूक....
पनवेल एस.टी स्टँड परिसरात एका इसमाची करण्यात आली ९० हजारांची फसवणूक....

पनवेल दि.०९ (वार्ताहर)- पनवेल एसटी स्टॅंड परिसरात एका इसमाच्या गळ्यातील व हातातील सोन्याची चेन व अंगठी असा मिळून जवळपास 90 हजारांचा ऐवज फसवणूक करून एक अज्ञात इसम घेऊन गेल्याची घटना घडली आहे.
          भगवान गायकवाड (वय-54, धंदा-रिक्षाचालक) हे पनवेल एसटी स्टॅंड विसावा हॉटेल समोरील रस्ता ते कळंबोली गाव दरम्यान यातील आरोपी इसमाने त्यांच्या गळ्यातील व हातातील सोन्याची चेन व अंगठी हे दागिने सॅंपल म्हणून वजन काट्याच्या मशिनवर ठेवण्याच्या बहाण्याने फसवणूक करून तो इसम निघून गेला आहे. 
सदर इसमाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे, रंग सावळा, उंची 5 फूट 7 इंच अंदाजे, डोक्यावरील केस बारीक काळे, चेहरा उभट, नाक सरळ, मराठी भाषा अवगत असून अंगात चौकोनी रंगाचा फूल बाह्यांचा शर्ट व राखाडी रंगाची फूल पॅंट घातली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments