टँकरच्या धडकेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू...
टँकरच्या धडकेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू...
पनवेल दि.२९(वार्ताहर): पनवेल जवळील तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये दिपक फर्टिलायझर्स कंपनी जवळच्या रस्त्यावर आज झालेल्या भीषण अपघातात पनवेल महापालिकेच्या दोन कंत्राटी सफाई कामगारांसह सिडकोच्या माळी कामगाराचा मृत्यू झाला आहे.
         पनवेल महानगरपालिकेत काम करणारे दोन कंत्राटी सफाई कामगार तसेच सिडकोचा एक माळी कामगार हे तळोजा एमआयडीसीतील काम करून मोटारसायकलवरून घरी परत जात होते. दिपक फर्टिलायझर कंपनी जवळच्या रस्त्यावर एका टॅंकरखाली चिरडून दोन सफाई कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर माळी कामगाराचा एमजीएम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. शांताराम निरगुडा आणि काळुराम पारधी या दोन सफाई कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झाल्याचे समजताच ताबडतोब मोठी गर्दी जमा झाली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन जमावाला शांत केले. दरम्यान साई गणेश इंटरप्रायझेस या कंपनीचे व्यवस्थापक राकेश भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा देत असताना सांगितले की शांताराम निरगुडा वय (२७ वर्ष ) आणि काळुराम पारधी (वय २७ वर्ष) हे दोन्ही कामगार हे आमच्याकडे कामाला असून कामावरून घरी जात असताना त्यांना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. दोघांना उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासोबत त्यांचा मित्र भुऱ्या पारधी हा माळी कामगार होता. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, परंतु त्याचाही मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
        
फोटो- झालेला अपघात
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image