महापिालका क्षेत्रातील कोविड रूग्णालयांना सर्तकतेच्या सूचना...
पनवेल, दि. २९ : कोविडच्या ओमिक्रॉन या नव्या धोकादायक विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील 37 रूग्णालयांची ऑनलाईन पध्दतीने बैठक घेण्यात आली. यावेळी कोविड रूग्णालयांना सतर्क राखण्याच्या सूचना देण्यात आल्या
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचना यावेळी कोविड रूग्णालयांना देण्यात आल्या. तसेच शासन नियमांनूसार महापालिका हद्दीतील कोविड रूग्णांलयांनी त्यांचे फायर, स्ट्रक्चरल ऑडीट आणि ऑक्सीजन पुरवठाविषयीची माहिती पालिकेला सादर न करणाऱ्या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.
तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रूग्णालयांवर पालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. संशयित पॉझीटिव्ह रूग्णांची माहिती पालिकेला कळविण्याच्या सूचनाही रुग्णालयांना देण्यात आल्या.
तसेच पालिका क्षेत्रातील प्रयोगशाळांस ओमिक्राॅन/बी१.१.५२९ या नमुन्याबाबतची माहिती पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागास देण्याविषयीच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
सर्व खाजगी रूग्णांलयाना ओमिक्रॉन विषाणू विषयीची माहिती सांगून या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेसंदर्भात सर्व तयारी करून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकिस उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकिय अधिकारी डॉ. भक्तराज भोईटे, डॉ. सुरेश पंडित, रूहिता शेलार तसेच पालिका क्षेत्रातील कोविड रूग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.