रायगडच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र पश्चिम विभाग क्रिकेट संघात निवड....
पनवेल / वार्ताहर : - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) 25 वर्षांखालील सी . के . नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्याकरिता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे ( एमसीए ) घेण्यात येणाऱ्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेसाठी रायगडच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र पश्चिम विभागीय संघात निवड करण्यात आली आहे . रायगडच्या ऋषिकेश राऊत , प्रतिक म्हात्रे , सिध्दार्थ म्हात्रे यांची 15 जणांच्या संघात निवड करण्यात आली आहे . अभिषेक खातू व रितेश तिवारी यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे . 2020 - 2021 मध्ये एमसीएने आयोजित केलेल्या आमंत्रीतांच्या स्पर्धेतील कामगिरी पाहून खेळाडूंची निवड करण्यात आली आहे , अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली .
महाराष्ट्राचा पश्चिम विभागीय संघ निवडण्यासाठी बुधवारी ( दि . 17 ) कोल्हापूर येथे सभा झाली . या सभेसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षचंद्रकांत मते उपस्थित होते . महाराष्ट्राच्या पश्चिमविभागीय संघात निवड झालेले रायगडचे पाचहीखेळाडू मागिल काही वर्षे एमसीएच्या 14 , 16 व 19 वर्षांखालील गटांच्या स्पर्धेत तसेच खुल्या गटाच्या स्पर्धेत रायगड संघाकडून खेळत आहेत .
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकात मते यांच्यामुळे एकाच वेळी रायगडच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र पश्चिम विभागीय संघात निवड होऊ शकली . रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक , उपाध्यक्ष प्रकाश पावसकर , अनिरूध्द पाटील , सचीव विवेक बहुतुले , राजेंद्र भावे , बशीर चिचकर , विजय उलवेकर , संतोष भोईर , प्रशांत ओक , सचिन मते , स्पर्धा समिती अध्यक्ष किरीट पाटील , निवड चाचणी समिती अध्यक्ष प्रीतम कैय्या तसेच इतर सदस्यांनी रायगडच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्राच्या पश्चिम विभागीय संघात निवड झाल्याबद्दल या खंळाडूंचे अभिनंदन केले " रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात . कोरोनामुळे मागील दोन वर्षे स्पर्धा होऊ शकल्या नाहित . रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या स्पर्धांमुळेच रायगड जिल्ह्यात चांगले खेळाडू तयार होत आहेत . त्यांना महाराष्ट्राच्या संघात संधी मिळत आहे .
चंद्रकांत मते , अध्यक्ष रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन -