खारघर मध्ये लवकरच आगरी-कोळी भवन :शिवसेनेच्या प्रयत्नांना यश ; नगरविकासमंत्र्याकडून हिरवा कंदील....
खारघर मध्ये लवकरच आगरी-कोळी भवन :
शिवसेनेच्या प्रयत्नांना यश ; नगरविकासमंत्र्याकडून हिरवा कंदील....
पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः पनवेल परिसरात नवी मुंबईच्या धर्तीवर आगारी कोळी कराडी भवन उभारण्याच्या मागणीला नगरविकास मंत्री यांनी हिरवा कंदील दिला असून, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मागणीला यश आले आहे . 
मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना केल्या आहेत.सेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी यासंदर्भात 13 ऑक्टोबर रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करीत आगरी-कोळी संस्कृतीचे प्रतीक असलेले आगारी कोळी कराडी भवन पनवेल महानगरपालिका क्षेत्र खारघर मध्ये उभारण्याची मागणी केली होती. 
नवी मुंबई ही आगारी कोळी कराडी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून उभी राहिली आहे. हजारो हेक्टर जागा सिडकोने संपादित करून या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे स्थानिक आगारी कोळी कराडी संस्कृतीचे भव्य-दिव्य असे भवन उभारणे गरजेचे आहे. अशी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भावना आहे. यासंदर्भात खारघर शहरात आशा प्रकारे भवन उभारले जाणार असल्याचे शिरीष घरत यांनी संगितले. सदर भवन सिडको मार्फत खारघर शहरात उभारले जाणार आहे असे घरत यांनी संगितले.
Comments
Popular posts
पनवेलमधील हुतात्मा स्मारक उद्यानात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा संपन्न...
Image
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना १०० व्या जन्मदिनानिमित शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे विनम्र अभिवादन ...
Image
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने पनवेल प्रभाग क्रं १९ मध्ये नामफलकाचे अनावरण..
Image
नितीन पाटील यांची पनवेल महानगरपालिकेतील महायुतीच्या गटनेतेपदी निवड...
Image
पनवेल महापालिका मुख्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन उत्साहात संपन्न...
Image