लोखंडी कपाऊंड जाळीचे बंडल चोरणारे ५ जण गजाआड.....
लोखंडी कपाऊंड जाळीचे बंडल चोरणारे ५ जण गजाआड.....

पनवेल,  दि. २०  (संजय कदम) - : शहरातील उरण नाका चिन्मय गौरांग सोसायटीमधून लोखंडी कंपाऊंड जाळीचे बंडल चोरणाऱ्या 5 जणांना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.
          या ठिकाणी साधारण 20 हजारांचे लोखंडी जाळीचे बंडल चोरीस गेल्याची तक्रार ईजाज शेख याने पनवेल शहर पोलिस ठाण्यात देताच वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश फरताडे, हवालदार रविंद्र राऊत, पो.ना. विनोद देशमुख, पो.शि. प्रसाद घरत, विवेक पारासुर, युवराज राऊत व मिसाळ आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार याद्वारे परिसरात सखोल चौकशी करून याप्रकरणी दिनेश टकले (वय-29, रा.-शिरढोण), राज चौधरी (वय-21, रा.-शिरढोण), गणेश सोनार (वय-21, रा.-शिरढोण), नरसिमा शिरनम (वय-21, रा.-शिरढोण पाडा) व भंगार खरेदी विक्री करणारा अब्दुल खान (वय-30, पळस्पा फाटा) या 5 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील सर्व माल हस्तगत करण्यात आला आहे. यांच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील अनेक घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Comments