पनवेल लाईन आळी येथील इसम बेपत्ता....
पनवेल, दि.९ (वार्ताहर) ः पनवेल शहरात एक ३८ वर्षीय इसम घरात कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शहरातील लाईनआळी येथे राहणारा ॠषिकेश लक्ष्मण कचरे (38) हा इसम कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेला आहे. उंची 5 फूट 5 इंच, रंग गोरा, डोक्याचे केस काळे, चेहरा गोल, नाक सरळ, पाठीवर लाल रंगाची चामखिळ त्याला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. त्याच्या अंगात खाकी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पो.हवा.फाळके यांच्याशी संपर्क साधावा.
फोटो ः बेपत्ता ॠषिकेश कचरे