पनवेल नवीन कोर्ट परिसरातील वाहतूक कोंडीबाबत वाहतूक शाखेची कारवाई...
पनवेल नवीन कोर्ट परिसरातील वाहतूक कोंडीबाबत वाहतूक शाखेची कारवाई...
पनवेल दि.10 (वार्ताहर)- पनवेल नवीन कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी तसेच चारचाकी, रिक्षा आदींमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन या भागातील रहिवाशांना नेहमीच त्रास झाला होता. या संदर्भात परिसरातील जागरूक नागरिकांनी पनवेल वाहतूक शाखेकडे तक्रार करताच अशा प्रकारांच्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरवात झाल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
          
नवीन कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियम न पाळता या ठिकाणी येणारे नागरिक आपली दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, रिक्षा हि उभी करून जातात. त्याचा नाहक त्रास या भागातील स्थानिक रहिवाशांना होत होता. वेडीवाकडी वाहने उभी केल्यामुळे वाहतूक कोंडीही होत होती. याबाबत या भागातील जागरूक नागरिकांनी पनवेल वाहतूक शाखेकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारींच्या आधारे पनवेल वाहतूक शाखेने टोईंग गाडीच्या माध्यमातून या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. याठिकाणी नो पार्कींगचे फलक लावूनही वाहनचालक या फलकाकडे दुर्लक्ष करून आपली वाहने त्याच ठिकाणी उभी करत असल्याने येथील स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

कोट-
मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करून बाहेरून येणारी माणसे आपली वाहने येथे बेजबाबदारपणे लावत असल्याने आम्हाला स्थानिकांना आमच्या सोसायटीत जायलासुद्धा रस्ता मिळत नाही व वाहनेही आतून काढता येत नाहीत. तरी वाहतूक शाखेने हि कारवाई नियमित सुरू ठेवावी.
- अतुल भोईर
चेअरमन, नील पार्क सोसायटी.
   

           
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image