शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या माध्यमातून आदिवासी वाड्यांवर दिवाळी फराळाचे वाटप...
शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या माध्यमातून आदिवासी वाड्यांवर दिवाळी फराळाचे वाटप...
पनवेल, दि.03 (वार्ताहर)- शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या माध्यमातून पनवेल परिसरातील आदिवासी वाड्यांवर दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
          प्रभाग क्र.-1 च्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांनी उटणे व रवा, मैदा, साखर व इतर साहित्य आदिवासी बांधवांना दिवाळी भेट म्हणून दिली. त्याचप्रमाणे तळोजा मजकूर आदिवासी वाडी येथेसुद्धा अशा प्रकारे वाटप करण्यात आले. यावेळी विश्वास पाटील, प्रल्हाद पाटील, नितीन गायकवाड, संजय पाटील , चंद्रकांत कातकरी, अनंत कातकरी आदी उपस्थित होते. यावेळी महिला मंडळ अध्यक्षा कल्पना अनंत कातकरी यांनी या उपक्रमाबद्दल शिवसेना व उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांचे आभार मानले आहेत.
         फोटोः शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या माध्यमातून आदिवासी वाड्यांवर दिवाळी फराळाचे वाटप सोबत इतर पदाधिकारी
Comments