आयएनआयएफडी पनवेलच्या माध्यमातून फॅशन इंडिया डिझायनिंगचा सोल संसेशन 3.0 चे आयोजन..
पनवेल, दि. १८ (संजय कदम) ः आयएनआयएफडी पनवेलच्या माध्यमातून यंदाही येत्या 4 डिसेंबर रोजी पनवेल जवळील काकाजीनीवाडी येथे फॅशन इंडिया डिझायनिंगचा सोल संसेशन 3.0 चे आयोजन करण्यात आल्याची माहिती डायरेक्टर सुरेंद्रसिंग जट्टी यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना सुरेंद्रसिंग जट्टी यांनी सांगितले आहे की, हा कार्यक्रम आमच्यासाठी गर्वाचा असतो. सहा वर्षापूर्वी ही संस्था आम्ही सुरू केली होती. त्यावेळी फक्त 9 विद्यार्थी होते. आजच्या घडीला 200 ते 250 विद्यार्थी असून 300 च्या वर विद्यार्थी फॅशन डिझायनिंगचा, इंटेरियल डिझायनिंग आदी उपक्रम शिकून गेले आहेत. आमच्याकडे पनवेल, नवी मुंबई सह खोपोली, कर्जत, रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग शिकण्यासाठी येत असतात. त्यांना फॅशन डिझायनिंगची माहिती व्हावी. देशात नवनवीन फॅशन येत आहे. त्याचे त्यांनी अवलोकन करावे, त्यातून शिकावे या उद्देशाने आम्ही या विद्यार्थ्यांना लॅक मे फॅशन शो, न्युयॉर्क फॅशन शो आदी ठिकाणी पाठवित असतो. अनेकदा हे विद्यार्थी त्यात सहभागीही होत असतात व तेथून एक चांगला अनुभव घेवून येतात. यावेळी सुद्धा आम्ही अशा विद्यार्थ्यांसाठी फॅशन शो चे आयोजन केले आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान तसेच जॅकलिन फर्नांडीस यांचे फॅशन डिझायनर अस्टेल रिबोरो हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यांच्यासह या क्षेत्रातील इतर मान्यवर व राजकीय व्यक्ती पनवेल महानगरपालिका आदींचा सहभाग या उपक्रमात असणार आहेत. या स्पर्धेत 40 च्या वर विद्यार्थी सहभागी होणार आहेत व आपले कलागुण सादर करणार आहेत. कोरोनामध्ये मध्यंतरी या सर्व स्पर्धा बंद होत्या. आता कोरोनाच्या शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून त्या स्पर्धा व शो पुन्हा सुरू होत असल्याने विद्यार्थी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
फोटो ः सुरेंद्रसिंग जट्टी फॅशन शो संदर्भात माहिती देताना.