चोरटयांनी मोबाईलचे दुकान फोडून तब्बल 12 लाख 22 हजारांचे मोबाईल फोन नेले चोरुन...
चोरटयांनी मोबाईलचे दुकान फोडून  तब्बल 12 लाख 22 हजारांचे मोबाईल फोन नेले चोरुन...

पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः घरफोड्या करणाऱया चोरटयांनी सीवूड्स सेक्टर-4ए मधील जिओ स्टोअर या मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील वेगवेगळ्या कंपन्याचे मोबाईल फोन व इतर वस्तू असा तब्बल 12 लाख 22 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन संपुर्ण दुकान साफ केल्याचे उघडकिस आले आहे. एनआरआय पोलिसांनी या गुह्यातील तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  
सीवूड्स सेक्टर-46ए मधील श्रीजी हाईट्स (अक्षर टॉवर)या इमारतीत जिओ कंपनीचे मोबाईल फोन, एसेसरीज, स्मार्ट वॉच व सिम कार्ड विक्रीचे दुकान असून या दुकानात जिओ कंपनीकडून विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल फोन, एक्सेसरीज व इतर इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या स्टोअरवर काम करणारे कामगार दुकान बंद करुन आपल्या घरी गेले होते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास तिघा चोरटयांनी जिओ स्टोअर या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर सदर चोरटयांनी दुकानातील विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल फोन, एसेसरीज, स्मार्ट वॉच व दुकानातील इतर वस्तू असा चोरुन पलायन केले.  या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱयावर लक्ष ठेवणाऱया व्यक्तींकडून दुकानातील कर्मचाऱयांना दुकानात चोरी झाल्याची माहिती देण्यात आल्यानंतर दुकानातील कर्मचाऱयांनी सकाळी दुकानावर धाव घेतली. त्यानंतर चोरटयांनी संपुर्ण दुकान साफ केल्याचे त्याच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, पहाटेच्या सुमारास सदर दुकानात तीन चोरटे घुसल्याचे व त्यांनीच सदरचे दुकान साफ केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन  चोरटयांचा शोध सुरु केला आहे.
Comments