२९ टन कांद्या संदर्भात ४ लाख ७५ हजार रुपयाची फसवणूक....
२९ टन कांद्या संदर्भात ४ लाख ७५ हजार रुपयाची फसवणूक....

पनवेल,  दि.29 (संजय कदम) ः मोबाईल फेसबुक साईटवर इंपोर्ट एक्स्पोर्ट संबंधित ग्रुपवर एका व्यक्तीची ओळख झाल्याने त्याने सांगितल्याप्रमाणे 29 टन कांदा हा दुबईला पाठवायचा आहे व त्या मोबदल्यात तुम्हाला 4 लाख 75 हजार रुपये मिळतील असे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अमित माने यांची मोबाईल फेसबुक साईटवर इंपोर्ट एक्स्पोर्ट संबंधित ग्रुपवर अज्ञात व्यक्ती संतोष पवार यांची ओळख होवून त्यांच्याशी संपर्क साधला असता त्याने सांगितल्याप्रमाणे 29 टन कांदा हा दुबईला पाठवायचा आहे व त्या मोबदल्यात तुम्हाला 4 लाख 75 हजार रुपये मिळतील असे आमिष दाखविले. 
परंतु आतापर्यंत टेलिग्राफीक ट्रान्सफर परत न करता त्याची खोटी पावती पाठवून सदर व्यक्तीने त्यांची फसवणूक केल्याने याबाबतची तक्रार त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image