खाकी वर्दीतील देवमाणूस, पोलीस उपनिरीक्षक मनिष बच्छाव यांचे केले नगरसेवक रवींद्र भगत यांनी कौतुक .....
खाकी वर्दीतील देवमाणूस, पोलीस उपनिरीक्षक मनिष बच्छाव यांचे केले नगरसेवक रवींद्र भगत यांनी कौतुक... 
पनवेल, दि.21 (संजय कदम) ः खाकी वर्दीतील देव माणूस म्हणून कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनिष बच्छाव यांचे त्यांनी कोरोना काळात केलेल्या मदतीच्या पार्श्‍वभूमीवर विशेष कौतुक नगरसेवक रवींद्र भगत यांनी केले आहे.
पोलीस उपनिरीक्षक मनिष बच्छाव हे कोरोनाच्या पहिल्या दिवसा पासुन नागरिकांना आव्हान करण्याचे आणि सजस्याने समजावून सांगत असत. एकदा ते कळंबोली डी मार्ट जवळ बंदोबस्तात होते. घरातुन एक व्यक्ती सुद्धा बाहेर पडत नव्हती अशातच एक बाई आपल्या 8 महिन्याच्या मुलाला घेऊन जात असताना त्यांनी तिला थांबवले ये बाई एवढ्या उन्हाची कुठे चाललीस असे विचारले असता तिने सांगितले की, 2 दिवस झाले खायला अन्न नाही मुलाला दुध नाही एक तरी दुकानातून मला सामान आणू द्या असे बोलल्याने तीचे ते बोलणे ऐकून तात्काळ मनिष बच्छाव यांनी त्यांच्या गाडीत असलेले धान्याचे किट काढून तिला दिले. त्यावेळी तीचा पती धावत आला. त्याला वाटले की पोलीस आपल्या पत्नीला मारत आहेत. परंतु पोलिसांमधील मायेचा ओलावा बघून त्या दोघा पती-पत्नींच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले हा अनुभव स्थानिक नगरसेवक रवींद्र भगत यांनी स्वतः बघितला होता. आज मनिष बच्छाव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना त्यांनी एवढेच सांगितले की, कळंबोली वासियांनी एक खाकीमधील देव माणूस पाहिला आहे.

फोटो ः कर्तव्यात तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक बच्छाव व त्यांचे सहकारी
Comments