महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल
पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा सातासमुद्रापार नेत सहा.पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावून पोलिसांची आन-बान-शान उंचावून ठेवली आहे.
जागतीक शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये सहा. पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांना ब्रांझ मेडल पी 12 व्या वर्ल्ड बॉडीबिल्डींग अ‍ॅण्ड फिजिक्स चॅम्पिअनशीप तश्कंद उझबेकीस्तान 2021 या बॉडीबिल्डींग स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करून 80 किलो गटामध्ये ब्रॉझ मेडल मिळविलेले आहे. त्याचबरोबर यापुर्वी 13 मार्च 2021 रोजी खारघर नवी मुंबई येथे झालेल्या मास्टर महाराष्ट्र श्री 2021 या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवून मास्टर महाराष्ट्र श्री किताब मिळविलेला होता. त्यानंतर लुधियाना, पंजाब येथे 21 ते 22 मार्च 2021 रोजी झालेल्या मास्टर भारत श्री 2021 या स्पर्धेमध्ये 80 किलो गटामध्ये गोल्ड मेडल व मास्टर भारत श्री 2021 हा किताब मिळाला आहे. तसेच श्री सुनित जाधव ( आशिया श्री . ) आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर यांचे मार्गदर्शनाखाली वर्ल्ड बॉडी बिल्डींग स्पर्धेसाठी दररोज 6 तास व्यायाम रिसेट जिम बांद्रा व वन अबॉव्ह जिम नेरुळ या ठिकाणी सराव करीत असे व योग्य असा आहार घेत असे या स्पर्धेमध्ये भारतातील 70 खेळाडू सहभागी झाले होते. तसेच 30 देश व 360 खेळाडुनी सहभाग नोंदविला होता. सुभाष पुजारी हे महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे नवी मुंबई या ठिकाणी नेमणुकीस आहेत. पोलीस दलात सेवा बजावित असताना त्यांनी शरीरसौष्ठव हा छंद जोपासला आहे. पोलीस सेवेत कार्यरत असलेल्या अधिका - यांमधुन आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी संपादन केलेला हा बहुमान पोलीस दलासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांचे सर्व स्तरामधुन कौतुक होत आहे. त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे असा बहुमान मिळविणारे ते भारतातील पहिले पोलीस अधीकारी आहेत. त्यांच्या या यशाबददल अपर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय (वाहतुक), पोलीस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान, पत्नी सौ . रागिनी पुजारी, चेतन पाठारे सेक्रेटरी वर्ल्ड बॉडीबिल्डींग असो, विक्रम रोठे अध्यक्ष महाराष्ट्र बॉडीबिल्डींग असो. यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेहुन पनवेलमध्ये परत आल्यानंतर खांदा कॉलनीमधील रहिवासी तुलसी प्रेरणा सोसायटीमधील रहिवासी व कुटुंबीयांनी व पोलीस खात्यामधील अधिकारी व कर्मचारी यांनी मोठया उत्साहात त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रितम म्हात्रे विरोधी पक्षनेते, युवा मोर्चा भाजपा प्रदेशाध्यक्ष व मा.उपमहापौर विक्रांत पाटील, नगरसेवक व इतर राजकीय व सामाजिक, किडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. या मिळविलेल्या यशाबद्दल सतेज पाटील व शंभुराजे देसाई गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, अपर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय व अपर पोलीस महासंचालक - नागरी हक्क संरक्षण, विनय करगांवकर, पोलीस आयुक्त पुणे शहर,  अमिताभ गुप्ता, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रशांत ठाकुर, आमदार रोहीत पवार, आमदार सुजीत मनचकर, दिलीप सावंत पोलीस उपमहानिरीक्षक मुंबई शहर, पोलीस अधीक्षक श्रीमती सुनीता साळुंके-ठाकरे , पोलीस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान, डॉ.मोहन दहीकर, पोलीस अधीक्षक महामार्ग ठाणे परिक्षेत्र यांनी विशेष अभिनंदन केले.


फोटो ः सुभाष पुजारी
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image