पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली एकाची हत्या....
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली एकाची हत्या....

पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात आज दुपारी एक अंतर्गत वादातून एका इसमाची त्याच्या ओळखीच्या इसमाने हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
रेल्वे स्टेशन परिसरात राहणार्‍या रब्बानी या इसमाची त्याच्याच एका ओळखीच्या इसमाने अंतर्गत वादातून हत्या केल्याची माहिती समजत असून या संदर्भात माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांचे पथक, गुन्हे अन्वेेषण शाखेचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून त्यांनी यामध्ये काही जणांना ताब्यात घेतले आहे. सदर हत्या का करण्यात आली याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
Comments