शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या आर्थिक साहाय्याने ज्ञानेश्वर सोनवणेंचा व्यवसाय पुन्हा सुरू .....
पनवेल वैभव / प्रतिनिधी : - खारघर शहरातील ज्ञानेश्वर सोनवणे दोन्ही पायाने अपंग आहेत. ते आपला अपंग स्टॉल चालवून उदर निर्वाह करत असत. परंतू कोरोना काळात त्यांचा व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांचा अपंगांसाठीचा स्टॉल मोडकळीस आला होता. त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन, आपली व्यथा मांडली.
कार्यतत्पर जिल्हाप्रमुखांनी त्वरित , विना विलंब त्यांचा मोडकळीस आलेला अपंग स्टॉल दुरूस्ती करण्यासाठी आर्थिक सहाय्य करून, त्यांचा बंद पडलेला व्यवसाय (रोजगार) पुनः सुरू करून दिला व शुभेच्छा दिल्या.
यावेळी महानगर समन्वयक गुरूनाथ पाटील, उपशहर प्रमुख प्रकाश गायकवाड, माजी उपशहर प्रमुख रवी धाडवे, शिवसेना उत्तर भारतीय शहर अध्यक्ष शैलेन्द्र त्रिपाठी, जेष्ठ शिवसैनिक गिरिष गुप्ता व जगन्नाथ सोनार आदि पदाधिकारी उपस्थित होते.