खांदा कॉलनी मधील रस्त्यांना डांबराचा सीलकोट देऊन तातडीने दुरुस्त करा - महादेव वाघमारे
 पनवेल / वार्ताहर : - महानगर गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खांदा कॉलनी येथील रस्ते गेल्या दोन वर्षापासून खोदून ठेवले होते ७ डिसेंबर २०२० रोजी परिवर्तन सामाजिक संस्थेने थाळीनाद आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सिडकोने खांदा कॉलनीतील रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त केले होते , पावसाळ्या नंतर खांदा कॉलनीतील पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाली आहे , खड्डे पडलेत , माती वर दिसत आहे दोन स्तर डांबर केले होते डांबराचा फायनल सीलकोट सिडकोने मारला नव्हता.

डांबराचा फायनल सीलकोट पावसाळ्यानंतर केला जाईल असे आश्वासन सिडकोने महादेव वाघमारे यांना दिले होते आता पावसाळा संपला आहे तसेच पुन्हा खांदा कॉलनीतील रस्त्याची दुरावस्था झाली आहे अशा नागरिकांच्या तक्रारी आमच्या कार्यालयास प्राप्त आहेत अश्या सिडकोला दिलेल्या पत्रात वाघमारे यांनी सांगितले आहे सिडकोने दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करून खांदा कॉलनीतील रस्त्यांना सीलकोट देऊन रस्ते दुरुस्ती करून खांदा कॉलनीकरांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिका कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी केली आहे
Comments