देशी दारूचा साठा हस्तगत...
देशी दारूचा साठा हस्तगत...

पनवेल दि. ०३ (वार्ताहर)- तालुक्यातील इंडिया बुल्स येथील लेबर कॉलनी कोनगाव परिसरातून एका इसमास बेकायदेशीररित्या देशी दारूचा साठा केल्याप्रकरणी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
         
सदर ठिकाणी गुरूदत्त म्हात्रे (वय-32) हा बेकायदेशीररित्या देशी दारूचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वपोनि रविंद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार, पो.ना. यासिम शेख, पो.शि. सतिश दराडे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून जवळपास 2400 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image