महिला बचत गटातर्फे दिवाळी निमित्त प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन....
महिला बचत गटातर्फे दिवाळी निमित्त प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन....

पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः नवी मुंबईतील महिला उद्योजिका तसेच महिला बचत गट यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त पनवेलमध्ये भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  
पनवेलच्या के.गो.लिमये वाचनालय येथे 22, 23 ,24 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत या भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी माया जाधव तसेच चित्रपट व नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात ज्वेलरी,अगरबत्ती, कपडे,फरसाण, मिठाई व पर्सेस, हर्बल प्रोडक्ट, आयुर्वेदिक तेल,दिवे, मसाले,सुगंधी उटणे,बेडशीट आदी  वस्तूंची विक्री प्रदर्शनात होणार आहे. या महोत्सवाचे आयोजन सुनिता खिल्लारे व संगीता थोरात यांनी केले आहे.
Comments