घरफोडीत ४५ हजाराची रोख रक्कम लंपास.....
घरफोडीत ४५  हजाराची रोख रक्कम केली लंपास.....

पनवेल,  दि.   १३   (संजय कदम) ः एका बंद घरात अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत 45 हजार रुपयाची रोख रक्कम लंपास केल्याची घटना तालुक्यातील शिरढोण गाव येथील ग्रीन मेडोज सोसायटीमध्ये घडली आहे.
या ठिकाणी राहणार्‍या शुभांगी कसबे यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी कोणत्या तरी कठोर वस्तूने त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून त्यावाटे घरामध्ये प्रवेश करून घरामधील लाकडी कपाटामध्ये ठेवलेली 45 हजार रुपये किंमतीची रोख रक्कम चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments